Back
Fitting…

1 page

कुणी आलं कुणी आलं

कुणी आलं कुणी आलं
जीवाला वेड लावून गेलं

नाही ठाऊक नांव
नाही माहीत गाव
मला पाहून उगीच हंसलं

होते आंबेवनात
गीत मजेत गात
तोच पाल्यांत पाऊल वाजलं

गोड सकाळचा पार
वारं झुळुझुळु गार
फूल उंबराचं अवचित फुललं

गाणं राहिलं गळ्यांत
दृष्टी फिरली मळ्यांत
टोंक फेट्याचं पिकांत लपलं

त्याच्या नजरेची धार
भेदी जीवास पार
त्यानं चोरून काळीज नेलं

कुणी आलं कुणी आलं

कुणी आलं कुणी आलं
जीवाला वेड लावून गेलं

नाही ठाऊक नांव
नाही माहीत गाव
मला पाहून उगीच हंसलं

होते आंबेवनात
गीत मजेत गात
तोच पाल्यांत पाऊल वाजलं

गोड सकाळचा पार
वारं झुळुझुळु गार
फूल उंबराचं अवचित फुललं

गाणं राहिलं गळ्यांत
दृष्टी फिरली मळ्यांत
टोंक फेट्याचं पिकांत लपलं

त्याच्या नजरेची धार
भेदी जीवास पार
त्यानं चोरून काळीज नेलं

कुणी आलं कुणी आलं

कुणी आलं कुणी आलं
जीवाला वेड लावून गेलं

नाही ठाऊक नांव
नाही माहीत गाव
मला पाहून उगीच हंसलं

होते आंबेवनात
गीत मजेत गात
तोच पाल्यांत पाऊल वाजलं

गोड सकाळचा पार
वारं झुळुझुळु गार
फूल उंबराचं अवचित फुललं

गाणं राहिलं गळ्यांत
दृष्टी फिरली मळ्यांत
टोंक फेट्याचं पिकांत लपलं

त्याच्या नजरेची धार
भेदी जीवास पार
त्यानं चोरून काळीज नेलं