कुणि गोविंद घ्या, कुणि गोपाळ घ्या या ग सयांनो, या ग या अविनाशी हा आनंद घ्या चिरंतनाचा सुगंध घ्या नभात फुलवी गोड चांदण्या, बाळच ग हसतो महाराष्ट्राचे भाग्य उद्याचे मुठीत नाचवितो दुष्टांना का हुंकारुन ग दहशत हा भरतो राजफुलाचा विकास घ्या, चैतन्याचा सुहास घ्या चार दिशांचे चौखुर सुंदर पृथ्वीच्या पाळणी नक्षत्रांचे छत्रकमल हे झुलत्या सिंहासनी हसवा रिझवा शिवरायाला जो जो ग गाउनी युगायुगाचा सारंग घ्या, क्रांतीचा हा आरंभ घ्या