कुंजात विहरतो सुगंध शिंपित वारा दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा ! हृदयात छेडती कोमल सूर सतारी उमटले अनामिक स्वप्न मनाच्या दारी मज आशय कळला तुझ्या प्रीतीचा सारा दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा ! रंगात अबोली थरारता ओठांत राहु दे सुरंगी पाचुपंख बोटांत बिलगली पाखरे कळ्यांस देत इशारा दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा ! बहरात फुलांच्या कमान झुकली खाली अंगात उमलुनी तिथे पौर्णिमा आली बरसल्या अंतरी इथे सुखाच्या धारा दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा !