कुठं कुठं जायाचं हनिमूनला
अवो भरल्या बाजारी धनी मला तुम्ही हेरलं
हेरलं ते हेरलं अन् लगीन आपलं ठरलं
लगीन झालं, गोंधळ झाला
आता एक काम हो उरलं
लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा
बेंगलोर गोवा नि काश्मिरला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला?
रातभर एकली जागू कशी?
सासूला अडचण सांगू कशी?
घरात पाव्हणं न् दारात मेव्हणं
एकान्त मिळेना भेटायला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला?
नऊवारी नेसून कारभारी
खेटून बसेन शेजारी
गरम अंथरूण, गरम पांघरूण
गरमागरम ह्यो मामला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला?
गुलाबी थंडीत गमतीनं
मजेत राहू या संगतीनं
जातानं दोघं न् येताना तिघं
नातूच आणूया दावायला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला?