मदनाची मंजिरी साजिरी
मदनाची मंजिरी । साजिरी । उषाच हंसरी चंद्रिकाच कोंवळी । काय ही नाजुक चांफेकळी? रसिक मनोहारिणी घटीं या रसिक-चित्त भरुनी कुरंग-नयना कुठें आजला गज-गमना चालली? उरोज कुंभापरी रम्य हा कुंभ शोभतो शिरीं सुधा-कुंभ घेउनी येइ का रंभा वसुधातलीं?