मधु इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात एक चंद्र अन् अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारे हवी झोपडी मिळे कोठडी सरकारी खर्चात अजब ही मधुचंद्राची रात माहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले ताटातुटीने सुरेख झाली संसारा सुरुवात अजब ही मधुचंद्राची रात किती पाहुणे किती निमंत्रित, जमले सारे एका पंक्तीत अशी निघाली लग्नानंतर वार्यावरती वरात अजब ही मधुचंद्राची रात