PrintSource

मागणें हें एक देई

Magane He Ek Dei

संत स्वामी स्वरूपानंद

मागणें हें एक देई भक्ति-प्रेम ।
देवा तुझें नाम गाईन मी ॥१॥

आवडीनें देवा गुण मी वर्णीन ।
प्रेमें न्याहाळीन रूप तुझें ॥२॥

भक्ति-भावें तुझे करीन पूजन ।
अंतरी चिंतन निरंतर ॥३॥

स्वामी म्हणे पायीं ठेवीन मी माथा ।
तेणें माझ्या चित्ता समाधान ॥४॥