मागण्यास आलो जे
मागण्यास आलो जे विसरुनि ते गेलो पण हृदयी फुलवात उजळुनि मी गेलो ओंजळ ही शब्दांची, मिटलेल्या पाकळ्या अनिलात मनगुज हे विखरुनि मी गेलो कोणता ऋतू नभी, पाहिले न पाहिले दृष्टभेट होताना बहरुनि मी गेलो वचनांचे शपथांचे ओझेही सरलेले हरवून मीपण हे लहरुनि मी गेलो