मागता न आले म्हणुनी
मागता न आले म्हणुनी राहिलो भिकारी ! लागली न वरणी माझी कोणत्याच दारी ! भाग्यवान लाचारांना दिसे मीच नंगा घेउनी न झोळी आलो म्हणुन मी लफंगा ! तशी जरी दातारांची मानतो भलाई फाटक्या खिशाला माझ्या बोचते कमाई ! आसवांत माझी अर्धी भाकरी बुडाली; सोसण्यात उरलीसुरली भूक शांत झाली !