महाराष्ट्राच्या कृष्णेकाठी मुशाफिरा चल माझ्यासाठी अपूर्व सुंदर मूर्त होउनी जिथे नांदते शौर्य मराठी हरहर गर्जत जरिपटक्याची जिथे नाचली भगवी काठी रक्त ठिबकल्या समशेरीचा टिळा शोभतो जिच्या ललाटी जिने उधळली शिवचरणावर जलपुष्पे ती अनंतकोटी नीत्य राहती दत्तदिगंबर जिच्या तटावर भक्तीसाठी जिला लागली समर्थ गुरुनी चैतन्याची शिकवण मोठी शीळ घालते नरसिंहांना जिथे लावणी सुस्वरकंठी थाप डफावर ऐकून प्रेते उठली येथे क्रांतीसाठी