मज आवडले हे गाव ! नदी वाहती, घाट उतरते तीरावरती गोधन चरते हिरवी मळई जळा चुंबिते इकडुन तिकडे तिकडून इकडे, खेपा करिते नाव मज आवडले हे गाव ! चहू बाजूला निळसर डोंगर मधे थिटुकले खेडे सुंदर निंब, बाभळी, अंबा, उंबर हलुनी डुलुनी सपर्ण फुलुनी, करिती शीतळ छांव मज आवडले हे गाव ! घरे ठेंगणी, वळत्या वाटा चावडीपुढचा रुंद चव्हाटा राउळशिखरी उंच बावटा भगव्या रंगे जगास सांगे वंशकुळाचे नाव मज आवडले हे गाव !