मज पाहताच सखये
मज पाहताच सखये हसतेस तू जराशी उजळून चांदण्यांच्या येती क्षणात राशी सांगायचे तुला की मज व्हायचे तुझा ग मानू नकोस परके तुझियाच काळजा ग सलगी करीत नाही का गंध अत्तराशी तुझियाविनाच छळतो हा घाव स्पंदनाचा जळतो उरात रात्री वैशाख अन् उन्हाचा हा खेळ वेदनांचा बेचैन अंतराशी उजळेल रोज माझी नयनी तुझ्या उषा ग झळकेल रोज माझी नयनी तुझ्या दिशा ग छाया तुझी मिळाया मी ऊन ऊन प्राशी