Back
Fitting…

1 page

मला लागली कुणाची उचकी

आली आली सुगी म्हणून चालले बिगीबिगी
गोष्ट न्हाई सांगण्याजोगी
कुणी गालावर मारली टिचकी
मला लागली कुणाची उचकी

कुणाची ग कुणाची? ह्याची का त्याची? लाजू नको, लाजू नको

तरणीताठी, नार शेलाटी, चढले मी बांधावर
अटकर बांधा, गोरागोरा खांदा, पदर वार्‍यावर
फडामध्ये चाहूल, वाजलं त्याचं पाऊल
माझ्या उरात भरली धडकी
मला लागली कुणाची उचकी

निजले डाव्या कुशी, हाताची उशी, करून मी कशी
वार्‍याच्या लाटा, थंडीचा काटा, मनात न्यारी खुशी
सपनात आला, त्यानं छेडलं बाई मला
त्याच्या डोळ्याची नजर तिरकी
मला लागली कुणाची उचकी

उठून सकाळी, ल‍ई येरवाळी, गेले पाणोठ्यावरी
उन्हात बसले न्हात, अंगाला पाणी गुदगुल्या करी
पाण्यामध्ये दिसं, त्याचं लागलं मला पिसं
त्यानं माझीच घेतली फिरकी