मम हृदयाची ललित रागिणी
मम हृदयाची ललित रागिणी होशिल का तू माझी ग राणी सांग अता सुंदरी तुझ्या प्रीतीचा मोहक चाळा नकळत सखये भुलवी मनाला प्रीतीसुधेने जीव बहरला लाजू नको मम प्रणय-कामिनी तुजपाशी ही काय मोहिनी हृदय जिंकिले नयनशरांनी धुंद सदा मी तुझ्या चिंतनी का छळिसी मज गाली हसुनी?