मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरून येतं पिकावर मन मोकाट मोकाट याच्या ठाई ठाई वाटा जशा वार्यानं चालल्या पाण्यावरल्या रे लाटा मन पाखरू पाखरू याची काय सांगू मात? आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळात मन जहरी जहरी याचं न्यारं रे तंतर अरे विंचू-साप बरा त्याला उतारे मंतर ! मन एवढं एवढं जसा खसखसचा दाना अन् मन केवढं केवढं? त्यात आभाळ मायेना आसं कसं मन देवा, आसं कसं रे घडलं? कुठे जागेपनी तुला असं सपनं पडलं !