मना तुझे मनोगत मला कधी कळेल का? तुझ्यापरी गूढ-सोपे होणे मला जुळेल का? कोण जाणे केवढा तू व्यापतोस आकाशाला आकाशाचा अर्थ देशी एका मातीच्या कणाला तुझे दार माझ्यासाठी थोडे तरी खुलेल का? कळीतला ओला श्वास, पाषाणाचा थंड स्पर्श तुझ्यामधे सामावला वारा, काळोख, प्रकाश तुझे अरूपाचे रूप माझ्यापुढे फुलेल का? कशासाठी कासाविशी, कशासाठी आटापिटी? खुळा ध्यास आभासांचा पाठलाग कोणासाठी? तुझ्या मनातले आर्त माझ्या मनी ढळेल का?