छुमछुम पायी वाजे घुंगुर गिरकी घेता फिरते अंबर ताल धिनक्धिन भिनला अंगी गोपी भिजल्या हरीच्या रंगी वेडी झाली राधा मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा ! यमुनेच्या त्या तीरावरती गोपी अशा जलक्रीडा करिती अवचित येता कृष्ण कन्हैय्या झाली त्रेधा त्रेधा मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा ! नटखट कान्हा खोड्या करितो फोडुनी मटका लोणी चोरितो रागे भरिता गोड हासुनी लावितसे कुळ नादा मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा !