मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते ! कुठेतरी मी उभाच होतो.. कुठेतरी दैव नेत होते ! कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना.. करू तरी काय? हाय, तेव्हा खरेच डोळे नशेत होते ! जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी निदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते ! मजेत होते ! बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो? धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते !