PrintSource

मनावर एक अनामिक भूल

Manavar Ek Anamik Bhool

सुधीर मोघे

मनावर एक अनामिक भूल
हे माझे पहिले पहिले पाऊल

नव्या जगाच्या उंबरठ्यावर
थोडी आतुर थोडी कातर
सूर लागता विरेल सारे उदास आणि मलूल

चैतन्याने, विश्वासाने
गाईन मी जगण्याचे गाणे
बघताबघता उमलून येईल मधुर यशाचे फूल

सात स्वरांच्या हिंदोळ्यावर
झोके नेईन उंच दूरवर
वर्तमान उलगडे दरवळे, भविष्य दे चाहूल