मथुरेत मी गोकुळी कान्हा
आवरिले मी नयनी आसू कसा आवरू उरिचा पान्हा मथुरेत मी गोकुळी कान्हा ! कुठे तान्हुले, कुठे माउली कुठे वासरू, कुठे गाउली त्यात शृंखला अशा पाउली कशी जाउ मी, पाहू तान्हा? बसल्या ठायी बसून पाहते चंद्रबिंब हळूहळू वाढते असेल झाले बाळ रांगते म्हणेल आई तेथे कोणा? स्वर्गाहुनिया ज्याची थोरी ते सांगाया जगात चोरी जाणशील का बाळा तू तरी?- तुझ्याचसाठी याही यातना