नाम आहे आदि-अंती
नाम आहे आदि-अंती, नाम सर्व सार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार नामे तरीले पतीत, तरीले पाषाण नामे कोळीयासी दिधले मुनीपद जाण नाम जाळी संचिताचा पूर्व बडिवार नाममय झाला चोखा, ब्रह्मी लीन झाला अजामेळ पापराशी वैकुंठासी गेला तेथे उभे पंढरीचे घेउनी आकार नाम जपो वाचा नित्य, श्वासांतही नाम नाममय होवो देवा माझे नित्य कर्म नामाच्याचसंगे लाभो प्रेम रे अपार