नदीकिनारीं माझा गांव
नदीकिनारीं माझा गांव ! ऊन पाऊस शिवेना, मोहाची छाया दाट आंब्याच्या राईंतुनी गेली माझ्या माहेराची वाट तिथल्या प्रेमळ आठवणींचा उरीं कोवळा घाव ! किती काढसी श्रावणमेघा, विरतिल पाण्यावरती रेघा झरझर सरत्या वाळूवरती अजुनि उमटलें नांव नकळे बाई कुणी वसविला, चराचरांच्या मनीं ठसविला पैलतिरीं न्यायास एकली प्रभुनांवाची नाव