नाहीं कशी म्हणूं तुला
नाहीं कशी म्हणूं तुला, म्हणतें रे गीत; परि सारें हलक्यानें : आड येते रीत. नाहीं कशी म्हणूं तुला.. येतें, जरा थांब; परि हिर्व्या वळणांनी जायचें न लांब. नाहीं कशी म्हणूं तुला, माळ मला वेणी; परि नीट, ओघळेल, हासतील कोणी. नाहीं कशी म्हणूं तुला, घेतें तुझें नांव परि नको अधरांचा मोडूं सुमडाव. नाहीं कशी म्हणूं तुला, जरा लपूंछपूं; परि पायां खडेकांटे लागतात खुपूं. नाहीं कशी म्हणूं तुला, विडा रे दुपारीं; परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी.