नाही पुण्याची मोजणी
नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणें गंगौघाचें पाणी कशाचा न लागभाग कशाचा न पाठलाग आम्ही हो फुलांचे पराग आम्हां नाही नामरूप आम्ही आकाशस्वरूप जसा निळानिळा धूप पूजेतल्या पानाफुला मृत्यु सर्वांगसोहळा धन्य निर्माल्याची कळा