नाकी डोळी नीट
Naki Doli Neet Davya
यशवंत देव
नाकी डोळी नीट डाव्या गालावर तीट
केसांची बट जिथं खुलायची, पुरुषाची जात तिथं फसायची !
रंगमहालाचा हिरवा रंग, खुलवितो प्रीती तो रंग
घ्यावा अनुभव बसून संग
पडली हवा थंडगार, अंगी झोंबतो शहार
दिव्यातली वात जिथं विझायची, पुरुषाची जात तिथं फसायची !
कधी रागाचा नकार लटका, गोर्या मानेस मोहक झटका
जाईल उडून डोईचा जरीपटका
तिकडं दावुनिया हुल, इकडं पाडेल भूल
लढत गनिमी काव्याची, पुरुषाची जात तिथं फसायची !
मुखी विडा रंगला केशरी, श्वासांत मिसळली कस्तुरी
मुखी विडा रंगला केशरी
एक दोन तीन चार, वाजे तुणतुण्याची तार
मुजर्याला मान जिथे लवायची, पुरुषाची जात तिथं फसायची !