PrintSource

नको आरती की नको

Nako Aarati Ki

वंदना विटणकर

नको आरती की नको पुष्पमाला
प्रभु भोवताली असे व्यापलेला

खगांच्या मुखाने प्रभु गाई गाणे
फुलांतून उधळी सुगंधी उखाणे
गगनात फुलवी नवरंग-लीला

सदासर्वकाळी दुज्यांसाठी झिजतो
पुण्यवान जगती खरा तोच जगतो
त्यागात मनुजा उभा स्वर्ग भरला

प्रकाशात फुलतो अंधार काळा
उन्हापाठी पळतो कसा पावसाळा
बुडे प्रेमरंगी कळे खेळ त्याला