माणसापरी माणूस, राहतो रे वेडा जाणा आणि होतो छापूनिया, कोरा कागद शहाणा नको लागू जीवा सदा मतलबापाठी हृदयाचं देणघेणं, नाही पोटासाठी उभे शेतामधी पिकं, ऊन्ह-वारा खात खात तरसती 'केव्हा जाऊ' देवा, भुकेल्या पोटात पेटवा रे चुल्हा आता, मांडा ताटवाटी नको लागू जीवा सदा मतलबापाठी पाहूनिया रे लोकांचे व्यवहार खोटे-नाटे तेव्हा बोरीबाभळीच्या आले अंगावर काटे राखणीच्यासाठी झाले शेताला कुपाटी नको लागू जीवा सदा मतलबापाठी