नको वळुन बघू माघारी
Nako Valun Baghu Maghari
मो. ग. रांगणेकर
नको वळुन बघू माघारी
जा रे खुशाल दर्यावरी
तुझ्या नि माझ्या प्रीतिची रे संगती
घेऊन शिदोरी आठवणींची
तुझी लाडकी उनाड होडी
बघुन समिंदर होइल वेडी
आणि तयाला कवळायाला सारखी घेइल उडी
त्या क्षणी याद तुला येऊन माझी जाशिल कळवळुनी
नाही सोबती तुझ्या संगती
एकटाच तू दर्यावरती
बघुन तुला रे येतील वरती, रत्नं सुंदर किती
त्यामध्ये नाही तुझी राणी पाहुनी, होशिल खिन्न मनी
तशी खुळी ती आभाळातुनी
नक्षत्रंही तुला हेरुनी
डोळे मोडुनी नाचुनी चमकुनी
येतिल खाली जरी रे
आठवेल रे झोपडीतली मिणमिणती चांदणी