नामाचिया बळें न भीऊं सर्वथा । कळिकाळाच्या माथा सोटे मारूं ॥१॥ वैकुंठीचा देव आणूं या कीर्तनीं । विठ्ठल गाउनी नाचो रंगीं ॥२॥ सुखाचा सोहळा करुनी दिवाळी । प्रेमें वनमाळी चित्तीं धरूं ॥३॥ सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा । तेणें मुक्तिद्वारा वोळंगती ॥४॥