PrintSource

नरजन्मामधिं नरा करुनि

Nar Janma Madhi Nara

शाहीर रामजोशी

नरजन्मामधिं नरा करुनि घे नरनारायण गडी
तरिच ही सार्थक मानवकुडीं

बा चौर्‍यांशीं लक्ष वेळ संसार पडला गळां
चिंतेचा पिकला मळा

दारधनाचा लोभ टाकुनी झटकर हो वेगळा
हा कसा उकलिशी पिळा

धनानिमित्तें जनापुढें तूं दाविसि नाना कळा
किति तुला मुलाचा लळा

तूं पडुं नको यांचे भरीं
तुझ्या हें खापर फुटतें शिरीं
तुला मी गोष्ट सांगतों खरी
आतां कर तांतडी
ही पुन: न ये बा घडी