नारदा मुनिवरा तुझे मी
नारदा मुनिवरा, तुझे मी गाता गौरवगीत रंगले हरिभजनी संगीत गळ्यात वीणा चिपळ्या हाती सदा वसे नारायण ओठी अवतारुनी तू क्षणोक्षणी साधिसी जगाचे हीत दोन खडावा पवित्र पायी शिखा शिरी शोभे शुभदायी कधी कुठे कळ लावुनी करिसी मति अमुची कुंठित त्रिभुवनी तू रचुनी कावा सत्कार्याते घेउनि धांवा चराचरासी तारण्यास व्रतकैवल्ये दावीत