PrintSource

नसता माझ्या मनात काही

Nasata Majhya Manat Kahi

पी. सावळाराम

नसता माझ्या मनात काही
पाठलाग हा उगाच बाई

झाली नजरानजर जराशी
हसला तुम्ही, हसले मीही
यात वावगे झाले काही?

बघत सारखे येता पुढुनी
ओठ चावुनी मनात गढुनी
मान खालती घालुनि जाई

जाताजाता मागे वळुनी
तुम्हीच बघता आले कळुनी
सहज जेधवा पाही मीही

स्वाभाविक ही उसळुनि आली
लाज रंगुनी खेळत गाली
अर्थ तयाचा भलता होई

पदराचा हा लागुन वारा
कोट छातीचा तुमच्या सारा
कोसळुनी हा सदैव राही