नसती झाली भेट तुझी ती नसते मी हसले हसता हसता मनही हुरळुनी जिवलगा नसते मी भुलले ढळत्या श्यामल तिसर्या प्रहरी जरी केला तू गनिमी हल्ला नसती झाली नजर फितुरी नसता पडला किल्ला लाल किनारी निशाण तव ते नसते शिरी चढले शरणांगतीने गालावरती पत्र गुलाबी जरी ते लिहिले नसती केलीस कैद प्रीती नसते नाते जडले निरोप घेता पाऊल माझे नसते कधी अडले