नवा डाव चल मांडायाला
नवा डाव चल मांडायाला मना नव्या गावा नव्या घरकुलासंगे होईल माझा जन्म नवा क्षितिज नवे अन् नवे गगनही नवे बळ मिळे पंखांनाही पुन्हा नव्याने लागे बहरू स्वप्नांचा ताटवा एक नवी माथ्यावर छाया नवलाईची होईल काया एक नवे माणूस भेटता होईल प्राण नवा भलेबुरे मग घडू दे काही भय-शंकांना थारा नाही मला पुरेसा माझ्या मधला विश्वासाचा ठेवा