नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी मनी नवीन भावना नवेच स्वप्न लोचनी ! दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी बोलण्या कुणासवे सूर दाटले मुखी अननुभूत माधुरी आज गीतगायनी ! अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी घर न प्रीतकुंज हा, बैस ये सुहासिनी कोण बाई बोलले? वाणी ही प्रियंवदा या मनात नांदते तुझीच प्रीतसंपदा कशास वेगळेपणा? जवळ ये विलासिनी !