नीरक्षीरालिंगनरूपी स्नान तुला तें घालोनी माझ्या अवलोकनवस्त्रांनी टाकिन तनु झांकोनी त्वत्प्रीतीच्या रक्तपणाच्या कुंकुमतिलका लावोनी तव तनुलतिकायौवनपुष्पें घालिन तुजवर गुंफोनी चिंतनिं तुझ्या श्वास जाति ते धूपापरि घे मानोनी मदन पेटवी तनुकर्पूरा ओवाळिन तुजलागोनी नैवद्यास्तव देइन माझा अधर घेंइ अपुल्या वदनीं कपटाचरणा केलें त्याची क्षमा करीं गे हरिभगिनी ॥