निघाले असतील राजकुमार
निघाले असतील राजकुमार पथ मिथिलेचे असतील चुंबित कमळदळे हळुवार कुठे पहाटे तृणांकुरांवर धुके पसरले असेल सुंदर हिमरंगावर निळी पाऊले उमटवीत सुकुमार कुठे तरूतळी सायंकाळी विसावेल ती मूर्त सावळी तरूशाखांनी असेल केला तारांसम झंकार अंग थरथरे लवती लोचन समीप असतील श्रीरघुनंदन आज स्मराने हळू उघडिले आर्त मनाचे द्वार