निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टि सारखी धरी तिचा कलीजा पदरीं निजला, जिवापलीकडे जपे त्याजला, कुरवाळुनि चिमण्या राजाला चुंबी वरचेवरी. सटवाई, जोखाइ हसविती, खळी गोड गालांवरि पडती त्याची स्वप्नें बघुनि मधुर तीं कौतुकते अंतरीं. अशीच असशी त्रिभुवनजननी, बघत झोपल्या मज का वरुनी? सुखदुःखांचीं स्वप्नें बघुनी कौतुकशी का खरी?