निळें हें व्योम निळें हें सप्रेम । निळेपणें सम आकारलें ॥१॥ नीळवर्ण ब्रह्म नीळवर्ण कर्म । नीळवर्ण आश्रम गुरु देखे ॥२॥ निळेपणें वर्तो नीळेपणें खातों । निळपण पाहातो निळे पणें ॥३॥ निळिये रजनी वाहे मोतिया सारणी । निळेपणें खाणीं सांपडली ॥४॥ मन तो निळिये गोविंदाचिये सोसे । विरहिणी पाहे वाटुलि ऐसी ॥५॥ ज्ञानदेव आला नीळवर्ण शाळा । निळेपण गोंवळा रातलीये ॥६॥