न्याहरी कृष्णाची घेऊनि
न्याहरी कृष्णाची घेउनी निघाली गवळण वृंदावनी वैशाख तापतो ऊन न लागे तिला टोचता कळेना काटाही पाउला हरिवेडी होउनी, निघाली गवळण वृंदावनी आजच्या पहाटे हाक मारल्याविना श्रीरंग जाई तो घेऊनिया गोधना यमुनातटी काननी, निघाली गवळण वृंदावनी एकान्त पाहुनी भेटून मनमोहना आपल्या करे ती भरविल दध्योदना हनुवटी कुरवाळुनी, निघाली गवळण वृंदावनी