ओळखिले मी तुला, नाथा ओळखिले मी तुला कुरूप सावळ्या मूर्तिमधला देवपणा जाणिला सौधावरती पडे चांदणे अर्ध्या मिटल्या माझ्या नयने टिपले कण ते अधीरपणाने सतार अंकी घेउनिया तू अनुरागची छेडिला ! कला करी तव उदारता मनी भीती रमली अंती पूजनी तव सहवासी मधु दिनरजनी काल सुगंधित देह सुगंधित, सुगंध उरी दाटला ! तुझ्यासारखा नाथ असावा तुझ्या छातीवर घेत विसावा उरलासुरला राग हसावा ठसा मूर्तिचा तुझ्या सानसा पोटी मी गोपिला !