ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥ देवा तूंचि गणेशू । सकळमतिप्रकाशु ॥ ह्मणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥२॥ अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल ॥ मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥ हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें ॥ ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें । आदिबीज ॥४॥ आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकलाकामिनी ॥ ते श्रीशारदाविश्वमोहिनी । नमिली मीयां ॥५॥