PrintSource

ऊठ राजसा उठी राजिवा

Ootha Rajasa Uthi Rajiva

माधव साखरदंडे

ऊठ राजसा उठी राजिवा
अरुणोदय झाला
तुझियासाठी पक्षीगणांचा वाजे घुंगुरवाळा

उषा हासरी येई नाचत
रुणुझुणु अपुले पैंजण घुमवित
विंझणवारा ताल देउनी नाचे रे घननीळा

जात्यावरती मंजुळ ओवी
घराघरातुन ऐकु येई
सूर सनईचे मिठी घालुनी वाहती तुज वेल्हाळा

बाल रविचे किरण कोवळे
दुडुदुडु येतील धावत सगळे
करतील गालावरती तुझिया मोरपिसांचा चाळा