ओटीत घातली मुलगी विहिणबाई सांभाळ करावा हीच विनवणी पायी वधुमाय तुम्ही ही, तुम्हा सारे ठावे वाटते तरीही आर्जवुनी सांगावे मी पदर पसरते जन्मदायिनी आई माहेर आपुले सत्पुरुषांच्या वंशी सासरी वाढत्या सतत सुखांच्या राशी पाठीशी आपुल्या नित्य उभी पुण्याई लाडकी लेक ही माझी पहिलीवहिली भाग्येच तियेच्या सून आपुली झाली तुम्हीच यापुढे तिजसी माझ्या ठायी