PrintSource

पाडाला पिकलाय्‌ आंबा

Padala Pikalay Aamba

तुकाराम शिंदे

आला ग बाई आला ग बाई आला ग
आला, आला, आला, आला
पाडाला पिकलाय्‌ आंबा

मासला बघुन तुम्ही जाणा वो पाव्हनं
नमुना बघुन तुम्ही जाणा वो पाव्हनं
पाव्हनं जरा थांबा, अरे घे
पाडाला पिकलाय्‌ आंबा

भारानं वाकलंय्‌ झाड
त्याला मी बाई जीवापाड
रातदिन आजवर जपलंय्‌
चोर खडा मारण्या टपलंय्‌
उघड कसं सांगू सांगा
पाडला पिकलाय आंबा

आंब्याचा रंग केशरी
वर लाली शोभे शेंदरी
तोंडाला तुझ्या पाणी सुटंल्‌
घेऊन टाक लगी म्हंजी
काळजी मिटंल्‌
घुटमळू नको तू बाबा
पाडाला पिकलाय्‌ आंबा