पद्मनाभा नारायणा
श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा ॥१॥ सकळदेवा आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा । महानंदा महानुभावा । सदाशिवा सहजरूपा ॥२॥ अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना । वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥३॥ तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणीं । हे चि करीतसें विनवणी । भवबंधनीं सोडवावें ॥४॥