पहाटे पहाटे मला जाग
पहाटे पहाटे मला जाग आली तुझी रेशमाची मिठी सैल झाली ! मला आठवेना.. तुला आठवेना.. कशी रात्र गेली कुणाला कळेना तरीही नभाला पुरेशी न लाली ! गडे हे बहाणे, निमित्ते कशाला? असा राहू दे हात माझा उशाला मऊमोकळे केस हे सोड गाली ! कसा रामपारी सुटे गार वारा मला दे उशाशी पुन्हा तू उबारा अता राहू दे बोलणे, हालचाली ! तुला आण त्या वेचल्या तारकांची, तुला आण त्या जागणार्या फुलांची लपेटून घे तू मला भोवताली !