पाहिलेस तू ऐकिलेस तू
पाहिलेस तू ऐकिलेस तू काय पुन्हा रे सांगू? अपराधाविण कठोर शासन कुठवर मी साहू? काळजातील धागे तोडून घरधनी जाता घर हे सोडून पतिप्रेमाविण कर हे जोडून काय तुला मागू? येऊ नये ती वेळ येऊन प्रपंचपूजा गेली उधळून आसवांची माळ ही ओवून सांग कुणा वाहू?