पाहिली काय वेलींनो
पाहिली काय वेलींनो तन्वंगी माझी सीता? देखिली काय वृक्षांनो शालीन धरेची दुहिता? हे ताल तरुंनो तुमची गगनाला शीर्षे भिडली आकाशपथी ती तुमच्या दृष्टीस कशी ना पडली उत्तुंग गिरींनो कोठे टेकिला सतीने माथा मेघांनो तुम्हाही का वैदेही दिसली नाही जाणीव पुण्यस्पर्शाची पवना तुज झाली नाही बोलली नाही का काही, ती व्योमपथाने जाता? निष्पाप आसवे कैसी झेलली फुलांनो नाही? हे विहंगमांनो सांगा तिजविषयी वार्ता काही एकटा जटायु का रे साक्षीस त्रिभुवनी होता?