PrintSource

पांखरा जा दूर देशी

Pakhara Ja Dur Deshi

अशोक जी. परांजपे

पांखरा जा दूर देशी
सांग माझा निरोप माझ्या साजणा

चैत्राचे चांदणे मला आज बोलवे
बोलण्यात त्याचिया भान पार मालवे
मी आज एकली, साथ ना कुणाची
म्हणूनिच लाडक्या, जा सांग ना

मैनेचे बोलणे मला आज आठवे
आठवांत होई ग मन फार हळवे
प्रीत आज हसली, साथ ना मनाची
म्हणूनिच लाडक्या, जा सांग ना